शाळा
शाळा एक ज्ञानमंदिर
व्हावी पुस्तकांशी दोस्ती.
इथे रुजावीत जीवनमूल्ये
नको परीक्षेची धास्ती.
इथल्या ज्ञानास अर्थ यावा
नकोच घोकमपट्टी.
माणूस घडावा देशासाठी
नकोच अप्पलपोटी.
आईसम "गुरू" असावा
नको हुकूमशाही .
शिक्षेतूनही वात्सल्य झरावे.
नको दडपशाही.
या शाळेतून पाखरं उडावीत
घेऊन आभाळभर शक्ती.
माणूसकीचे पंख असावेत
गुरुजनांवर भक्ती.
=====000=====